श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान गाव स्तरावर गरीबातील गरीब महिलांचे स्वयंसहायता समूह स्थापन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. त्यांच्या उपजीविका वाढीसाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.उपजीविका वाढीचा एक भाग म्हणून दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना अंतर्गत (DDU – GKY) स्वयंसहायता समूहातील मुला मुलींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर रोजगार मेळाव्याला विविध प्रशिक्षण केंद्राच्या व्यवस्थापकांना बोलावण्यात आलेले होते सदर रोजगार मेळाव्यासाठी तालुक्यातुन शंभरावर मुलं-मुली उपस्थित होती
सदर रोजगार मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक मोहित जनराऊत नैताम यांनी केले तर आभार कौशल्य विकास समन्वयक स्वप्नील गिरडकर यांनी केले.