हळदा येथे वाघाच्या हल्यात महिला ठार

श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

दिनांक 20 ऑक्टोंबर 2022
ब्रम्हपुरी:
ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना आज दिनांक 20 ऑक्टोंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.रूपा रामचंद्र म्हस्के वय ४० वर्ष असे वाघांच्या हल्ल्यांत ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

हळदा येथील रूपा रामचंद्र म्हस्के ही महिला स्वतच्या शेतात जनावरांकरिता गवत आणायला गेली होती.रूपा म्हस्के ह्या गवत कापत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून महिलेला ठार केले. वाघाच्या वाढत्या हल्ल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.वारंवार वाघाच्या हल्ल्यांच्या घटनात वाढ होत असून अनेकांना यात जीव गमवावा लागला आहे.मात्र वनविभागाने वाघांच्या बंदोबस्तासाठी अद्याप ठोस पावले उचलली नसल्याने वनविभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला आहे.वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.