श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
सावरगाव
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत तळोधी बीटातील सावरगाव येथे दोन बिबट्यांनी धुमाकूळ मांडला असून, गावाच्या सभोवताल शेतशिवासरात, स्मशानभूमीत, तर कधी रात्री गावात, लोकांच्या ते निदर्शनास येतात. त्यातच त्यांनी काल रात्री दुर्वास मांढरे यांच्या घरात प्रवेश करून शेळीचे छोटेसे पिल्लू उचलून घेऊन गेले.
दोन-तीन दिवसांपूर्वी सावरगाव लगतचा चिखलगाव येथील शेतकऱ्यांवर वाघाने हमला करून जखमी केले होते. व त्यातच आता चिखलगाव – सावरगाव येथे गावात या दोन बिबट्यांचा वावर असल्यामुळे व रोज गावात लोकांना ते निदर्शनास येत आहेत. त्यातच त्यांनी काल रात्र घरातून शेळीच्या पिल्लू उचलून नेल्यामुळे आता लोकांमध्ये भीती पसरलेली आहे. काल रात्र दुर्वास मांढरे यांच्या घरातून शेळीचा पिल्लू उचलून नेल्यानंतर त्याची माहिती देण्याकरिता तळोधी बिटाचे क्षेत्र सहाय्यक कार्तिक गरमडे यांना फोनवर संपर्क साधला असता त्यांनी खूप वेळ फोन उचलला नाही व नंतर ऊळवा ऊळविची दिले असे लोकांचे म्हणणे आहे. तर याची माहिती वनरक्षक एस.बी.पेंदाम यांना मिळतात त्यांनी ताबडतोब सावरगाव येथे येऊन , पी.आर. टी. टिम यांनी गावात गस्त घालून फटाके फोडून बिबट्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला.
व लोकांना सावधानता बाळगण्याच्या सूचना केल्या. मात्र गावातील लोकांनी लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा व यांना गावापासून दूर हाकलून द्यावे अशी वन विभागाकडे मागणी केलेली आहे.