वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार.!

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

ब्रम्हपुरी

तालुक्यातील कुडेसावली येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक:-२२/१०/२०२२ ला सकाळी ८:०० वाजाताच्या सुमारास घडली आहे.
श्री.सदाशिव रावजी उंदीरवाडे वय:- ७० वर्ष वाघाच्या हल्यात हल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकरी कुडेसावली येथील रहिवाशी आहे.

सविस्तर वृत्तांत असे आहे की, शेतकरी सदाशिव च्या शेतावार धानपिकाची लागवड केली असुन धानपिकाची देखभाल करण्यासाठी रोजच्या प्रमाणे स्वताच्या शेतावर गेला असता शेत हे जंगलालगत असुन बांधा आड दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकरी सदशिववर हल्ला केला त्यामध्ये शेतकरी सदाशिव चा जागिच मृत्यु झाला.
शेतकरी सदाशिवच्या पश्चात कुटुंबात पत्नी,मुलगा,सुन, दोन नातवंड असा आप्त परिवार आहे.
शेतकरी सदाशिवच्या जाण्याने उंदीरवाडे कुटुंबावर मोठे दुःखाच डोंगर कोसळला आहे.तसेच कूडेसावली गाव परिसर शोकसागरात बुड़ालेला आहे.
आता दोन तीन दिवसाअगोदर हळदा येथे वाघाच्या हल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली असतांना ही या आठवड्यातिल दूसरी घटना असुन हळदा ,कुड़ेसावली व सभोवतालिल गावपरिसर वाघाच्या दहशति मध्ये आलेला आहे.
तरी नरभक्षक वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबधित वनवीभगाने नरभक्षक वाघाच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नरभक्षी वाघाच्या दहशतीत आलेल्या ग्रामवासीयांनी व कुटुंबीयांनी केली आहे.