By Arun Barsagade
शिंदे-फडणवीस राज्य सरकारने १०० रुपयांची शिधा किट (१किलो रवा,१किलो तेल, १किलो साखर,१किलो चनादाळ) गरिबांना देण्याची घोषणा केली आणि दि.४ आक्टोबर २०२२ रोजी तसा शासन आदेश काढला परंतु अनेक गांवात किटमधिल चार पैकी रवा हे साहित्यच पुरवठा केला नाही तसेच माहे ऑक्टोबर २०२२ चे धान्य सुध्दा पुरवठा केला नाही. आणी ११३३ रुपयांचा सिलेंडर विकत घेऊन गरीब कुटुंब अन्न शिजवनार कसे? शिंदे-फडणवीस राज्य सरकारने केलेली ही घोषणा म्हणजे सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांची केलेली दिशाभूल आहे.
राज्यातील गरीब सामान्य कुटुंबांना जर दिलासा द्यायचाच होता तर सिलेंडर आणि खाद्य तेलाचे दर कमी करून माहे ऑक्टोबर२०२२ चे स्वस्त धान्य दुकानतील धान्य पुरवठा करुन दिलासा द्यायला पाहिजे होता. सिलेंडर, खाद्य तेलाचे दर कमी झाले असते व माहे ऑक्टोबर २०२२ चे धान्य मिळाले असते तर लाखो गरीब सामान्य कुटुंबांची दिवाळी आनंद उत्साहात जोरात झाली असती.
फक्त १०० रुपयांत किट देण्याची घोषणा करायची आणि स्वतःची वाहवाही लुटायची हा एकमेव कार्यक्रम शिंदे-फडणविस राज्य सरकारचा आहे. दिवाळी सुरू झाली असून सुद्धा आतापर्यंत किट मधिल रवा हे साहित्य नागरिकां पर्यंत पोहचलेला नाही.
दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात तरी राज्य सरकारने गरिबांची दिशाभूल न करता जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होईल असा निर्णय घेऊन राज्यातील लाखो कुटुंबांना दिलासा देण्याची गरज होती.