By Arun Barsagade
शामसरु ॲन्ड सन्स निर्मित म्युजिकेशन ॲकॅडमी सिंदेवाहीच्या वतीने दि.२२/१०/२०२२ रोजी सकाळी ६:०० वाजता दिवाळी पहाट या संगितमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री. शामराव मडावी यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून करण्यात आली.त्यानंतर मराठी/हिंदी भावगीत,अभंग,भजन,गझल व नाट्यगीतातून सिंदेवाही पंचक्रोशीतील ग्रामस्थांना संगीतमय शुभेच्छा देण्यात आल्या.कलावंतांच्या कला गुणांना वाव देऊन त्यांना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने खास दिवाळी सणानिमित्त हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.कॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी गायन व वादनाचे सादरीकरन केले.कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक राणी दुर्गावती(महिला)व संघर्ष(पुरुष)कृषी उत्पादक प्रक्रिया कंपनी सिंदेवाही हे होते.ॲकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे हे व्दितीय वर्ष होते.कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.