प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीन मजली इमारतीचे भूमिपूजन

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

शंकरपूर

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ची इमारत खूप जुनी असल्याने जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष डॉ सतीश वारजूकर यांनी विशेष प्रयत्न करून तीन मजली इमारतीचे बांधकाम मंजूर केले या कामाचे भूमिपूजन गुरुवारी सरपंच साईश वारजूकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 28 गावे येत असून 5 उपकेंद्र आहेत या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉ सतीश वारजुकर यांनी विशेष प्रयत्न करून तीन मजली इमारत मंजूर केलेली आहे या तीन मजली इमारतीची किंमत 95 लाख रुपये असून यामध्ये रुग्णांना बसण्याची व्यवस्था रुग्णांना विश्रांतीसाठी इमारत सोलर योजनेवर पाणी पुरवठा आणि परिसरात पेविंग ब्लॉक यासारखे काम या इमारतीमध्ये होणार आहे

या कामाचे भूमिपूजन शंकरपूर येथील सरपंच साईश वारजूकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी उपसरपंच अशोक चौधरी ग्रामपंचायत सदस्य सविता चौधरी नितीन सावरकर माजिद शेख संजय ननावरे निखिल गायकवाड शंकर शेरकी सपना घडसे रंजना उईके बेबी डहारे वंदना सहरे वैद्यकीय अधिकारी डॉ.जाभूळे मॅडम,डॉ.रामटेके, गोकुल भाऊ सावरकर , अमोद गौरकर ,कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते