CEO साहेब जरा चिमूर पंचायत समितीकडे लक्ष पुरवाल काय ?

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

चिमुर पंचायत समिती रामभरोसे

अधिकाऱ्याची दीवाळी उजेडात पंचायत समिती मात्र अंधारात

शासनाचे नियम धाब्यावर

 

महाराष्ट्रात चिमूर क्रांती नावाजलेला असून या भूमीत शासकीय अधिकारी येण्यास पुढे धजावत नाही. आता नुकताच दिवाळी हा सण झालेला असून पंचायत समिती चिमूर येथे दुपारी जवळपास 2 वाजताच्या सुमारास काही नागरीक कामांसाठी गेले मात्र इथे कोणीच अधिकारी कामावर उपस्थित नसल्याचा विडिओ सोशल मीडियावर काही नागरिकांनी टाकून लोकप्रतिनिधी यांचे लक्षवेधी व्हावे याकरिता व्हायरल करण्यात आले.

तालुका परिसरातील अनेक ग्रामीण भागात शेतकरी वर्ग राहत असते. त्यांना पंचायत समिती मध्ये अनेक अधिकारी कर्मचाऱ्याकडे शेती बाबत व अन्य अधिकाऱ्याकडे काम असतात. दिवाळी सण संपलेला आहे तरीपण अधिकारी आपल्या कर्तव्यावर हजर झाले नाहीत,  पंचायत समिती मधील अधिकारी कर्मचारी आपल्या कर्तव्यावर उपस्थित दिसून आलेले नसल्याचे नागरीक व शेतकरी वर्ग अधिकारी व कर्मचाऱ्यांबदल संताप झाले असल्याचे दिसून येते. या पंचायत समितीवर गटविकास अधिकाऱ्यांचा कोणताही वचक दिसून येत नसल्यानेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे मत प्रहार सेवक प्रविण वाघे व्यक्त केले आहे

चिमुर क्रा॓ती भुमीत शासकीय पंचायत समीतीमध्ये शासनाचे नियम धाब्यावर ठेवुन एकही अधीकारी हजर नसल्यामुळं गावातील समस्या शेती विषयक समस्या घेऊन कुणाकडे तरी दाद मागावी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकरी व्यक्ती समस्या घेऊन गेलेले नागरीक हे पंचायत समिती च्या चकरा मारुन त्रस्त झाले आहेत. त्यामुळं आता समस्या घेऊन तरी कुणाकडे जावे असा प्रश्न शेतकरी व सर्व साधरण व्यक्तींना पडत आहे. नाव जरी चिमूर क्रांती नगरी असले तरी समस्या मात्र प्रत्येक गावोगावी आहेत. लवकरच या निष्काळजी करणाऱ्या कार्यलयात उपस्थित राहात नसणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात लवकरच प्रहार सेवक प्रविण वाघे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे .

कुनाचही लक्ष नाही ! जनसामान्य नागरीका॓ना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जवाबदार कोण ?  चिमूर पंचायत समितकडे नवनियुक्त झालेले मुख्यकार्यपालन अधिकारी लक्ष देतील काय ?  असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे