श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
पाथरी
जीवन सुधारक बौद्ध विहार पाथरीच्या सौजन्याने गुरुवार रोजी बौद्ध विहारात बुद्ध मूर्तीचे प्रतिष्ठापन करण्यात आले. पाथरी येथील दिवंगत मुक्तेश्वर अंबादे यांच्या प्रथम पुण्यस्मरना निमित्य चेतन मुक्तेश्वर अंबादे यांचे कडून बुद्ध मूर्ती बौद्ध विहारास दान स्वरूपात देण्यात आले या बुद्ध मूर्तीचे गुरुवार रोजी भिकखु संघ तसेच पाथरी येथील उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या कार्यक्रमादरम्यान सकाळला शांती रॅली काढण्यात आली या शांती रॅली दरम्यान पाथरी येथील जाती धर्म च्या भेदभाव विसरून समस्त जनतेने रॅली त एकजुटीने सहभाग दर्शविला यानंतर जीवन सुधारक बौद्ध विहार पाथरी येथे भिक्खू संघाच्या कडून बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
तसेच बुद्ध मूर्तीचे प्रतिष्ठापनाचे औचित्य साधून जीवन ज्योती ब्लड सेंटर नागपूर या टीमच्या सहभागातून भीम आर्मी पाथरीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळाला असून तब्बल 40 रक्तदात्यांनी आपले रक्तदान दिले यानंतर भिकखु संघाकडून उपासक उपासिकेना प्रवचनाचा आस्वाद घेण्यास मिळाला त्यानंतर भोजनदान करण्यात आले व बौद्ध विहार पाथरी येथे भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला
यावेळी या कार्यक्रमास भिकखु संघ बौद्ध समाज अध्यक्ष श्रीनिवास सहारे, प्रवीण वाघमारे ,चेतन अंबादे,सतीश उंदिरवाडे,भीम आर्मी पाथरी अध्यक्ष मदन सोरदे, उपाध्यक्ष सचिन कसारे सचिव समीर सहारे ,जालिंद्र उंदीरवाडे रोशन करवाडे, दर्पण नंदेश्वर, गोलू वालदे ,बौद्ध समाज पाथरी ,बौद्ध महिला मंडळ पाथरी तसेच भीम आर्मी पाथरी व समस्त नागरिक उपस्थित होते