श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
भद्रावती : तब्येत बरी नसलेल्या मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी मोटरसायकल दिली नाही म्हणून राग अनावर झालेल्या व्यक्तीने एका 55 वर्षी ईसमाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केल्याची घटना तालुक्यातील कोरेगाव येथे घडली. या घटनेत घनश्याम सहारे याचा मृत्यू झाला. असून त्याचा मुलगा शक्ती घनश्याम सहारे वय 24 वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तर आरोपी तुकाराम नारायण भोयर वय 55 वर्षे याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान घटनास्थळाला पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी व उपविभागीय अधिकारी आयुष जपानी यांनी भेट देऊन पाहणी केली.
आरोपी नारायण भोयर याच्या मुलांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी मृतकाकडे त्याला दवाखान्यात नेण्यासाठी मोटरसायकलची मागणी केली. मात्र मृतकाने ती दिली नाही. यावरून दोघात वाद झाला. हा वाद मृतकांच्या मुलगा शक्ती याणि सोडविला दरम्यान आरोपी आपल्या घरी गेला व धारदार शस्त्र आणून त्यांनी घनश्यामच्या पोटात खूपसले शक्ती हा मध्ये पडल्यानंतर आरोपीने त्याच्यावर सुद्धा वार करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेत घनश्याम सहारे याचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झाल्या शक्तीला उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. या घटनेच्या अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र परदेशी व उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष निपाणी यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वात भद्रावती पोलीस करीत आहे.