सावरगाव
नागभिड तालुक्यातील सावरगाव येथे ५०० वर्षापासून ची परंपरागत सुरू असलेली ‘ढाल पूजा व गाय गोधन’ च्या निमित्याने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व गावाचे नाव प्रसिद्धीस आणणाऱ्या मान्यवरांचा हस्ते सत्कार सोहळा करण्यात आला.
हा सत्कार सोहळा सावरगाव येथील आदिवासी गोवारी युवा संघटना यांच्या वतीने करण्यात आला दिवाळीच्या गाय गोधन व ढाल पूजेच्या निमित्ताने सावरगाव येथील गाई गोधन (आकर) च्या स्थळावर सावरगावातील काही नामांकित व्यक्ती यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये विविध क्षेत्रात काम करणारे व गावाचे नाव प्रसिद्धीस आणणारे व्यक्ती विशेष यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये श्री यशवंत कायरकर यांचा पर्यावरण रक्षण , व अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातील प्रबोधन करिता तर महेश बोरकर यांचा परंपरागत गायगोधनाच्या कार्यकरीता सहकार्याबद्दल, सौ. नंदा संजय नेवारे, यांचा मातीच्या मुर्त्या बनवण्याच्या कलेबद्दल शाल व श्रीफळ देऊन तर पुरुषोत्तम नेवारे यांचाहि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक नेवारे यांनी केले तर, सूत्रसंचालन सचिन नेवारे यांनी केले. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून शिवशंकर सहारे, प्रमुख अतिथी म्हणून ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर श्री. अरुण बारसागडे उपसरपंच प्रवीण खोब्रागडे, युवराज रामटेके,पोलिस पाटील रवीद्र बोरकर, ग्रामपंचायत सदस्य कविता राऊत, सरिता खोब्रागडे, आशा गेडाम, दादाजी सेन्द्रे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योतीताई कोहरे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.