नागभीड येथे परंपरागत शिव-पार्वतीची स्थापना

श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

 

बुधवारला सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम.  

नागभीड

चाळीस वर्षीपासुन नागभीड येथे गोवर्धन चौकात दिवाळीच्या शुभ मुहूर्त वर सार्वजनिक शिव-पार्वती उत्सव मंडळ नागभीड येथे २३/१० / रविवारला शिव-पार्वती यांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. त्या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.यावर्षी मंडळाच्या वतिने २ नोव्हेंबर बुधवारला रात्रौ आठ वाजता सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आम. किर्तीकुमार भांगडीया, न.प.माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,माजी.जि.प.सदस्य संजय गजपुरे,जहांगीर कुरेशी,देविदास चिलबुले,हनीफ जादा,राजु चिलबुले,सौ.किरण गजपुरे तसेच इतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार आहे.त्याकरीता नागभिड शहरवाशिय तसेच परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आयोजक मंडळाचे पदाधिकारी कुणाल सहारे, सौरभ अमृतकर,विनायक सहारे ,गणेश सहारे, समिर आंबोरकर ,विशाल अमृतकर, विनोद गिरडकर, गोकूल अमृतकर, संकेत अमृतकर, इत्यादींनी कळविले आहे,