रिपब्लीकन विद्यार्थी फेडरेशन चे अध्यक्ष पदी विनोद मेश्राम तर सचिव प्रफुल मेश्राम यांची एकमताने निवड

श्री.अरुण बारसागडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

रत्नापूर दि 30

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे रिपब्लीकन विद्यार्थी फेड रेशन शाखा रत्नापूर ही संस्था कार्यरत आहे सदर सस्थेची वार्षीक सभा नुकतीच श्री सदानंद मेश्राम यांचे अध्यक्षते खाली रत्नापूर शिवनी मार्गावरील धम्मभुमी वर पार पडली यावेळी नविन कार्य कारणी गठीत करण्यात आली यात एकमताने अध्यक्ष म्हणून विनोद अर्जुन मेश्राम यांची तर सचिव म्हणून प्रफुल ताराचंद मेश्राम उपाध्यक्ष ओमप्रकाश मेश्राम सहसचीव रोहीत खोब्रागडे तर कोषाध्यक्ष म्हणून सुनिल डेकाटे यांची निवड करण्यात आली आहे हीसंख्या सामाजीक कामात नेहमी अग्रेसर असते त्याचे निवडी बददल सर्व बौद्ध समाज व रमाबाई महीला मंडळ रत्नापूर येथील व रि वि फे चे सर्व सदस्य यांनी स्वागत केले आहे.