वाघाच्या हमल्यात बैल गंभीर जखमी उपरी 

श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर

व्याहाड खुर्द उपवनक्षेत्र अंतर्गत सामदा बिटातील सोनापूर निलसनी पेडगाव परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलाच्या कडपावर हमला केला सर्व बैल इकडे तिकडे सैरावैरा पडू लागले मात्र वाघाने निलसनी पेडगाव येथील अरविंद बोदलकर या शेतकऱ्यांच्या बैलावर हमला केल्याने यात बैल गंभीर जखमी झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे सध्या मानवी हल्ले पाळीव जनावरे यांच्यात हिंसक प्राण्यांपासून संघर्ष निर्माण झालेला आहे त्यामुळे परिसरात होत असलेल्या दैनंदिन घटना मुळे परिसरात चांगली दहशत निर्माण झाली असून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा तारांबळ उडालेली असून वरील घटना माहीत होताच सामदा येथील वनरक्षक सोनेकर, उपरी येथील वनरक्षक कुळमेथे यांनी घटना स्थळ गाठून पंचनामा केला.