श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
भद्रावती शहरातील घटना.
भद्रावती.
एका भरधाव मोटरसायकलने समोर जात असलेल्या एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यु झाला तर पती गंभीर जखमी झाला असुन त्याला ऊपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.सदर अपघात शहरातील गवराळा परिसरातील मुख्य रस्त्यावर घडला.
आशा गोवर्धन खडसे वय ५१वर्ष राहणार श्रीनगर वसाहत भद्रावती असे या मृतक महिलेचे नाव आहे.या घटनेमुळे शहरातील भरधाव युवक बाइकस्वारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.पती-पत्नी हे दोघेही आपल्या दुचाकीने गवराळ्याकडून आपल्या घराकडे चालले असतांना शहरातील एका २१ वर्षीय युवक बाइकस्वाराने आपली मोटरसायकल भरधाव चालवित या दांपत्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली यात आशा गोवर्धन खडसे यांचा मृत्यु झाला तर पती गोवर्धन खडसे हा गंभीर जखमी झाले आहेत .भद्रावती पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास एपीआय कोल्हे करीत आहे.



