श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
“भारताच्या एकात्मतेसाठी पटेलांचे योगदान मोलाचे” -प्राचार्य डॉ. कुकरेजा
देसाईगंज: “भारताचे प्रथम गृहमंत्री सरदार पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना, त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. स्वातंत्र्यानंतर देशातील अनेक संस्थानिकांना भारतात सामील होण्यासाठी त्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नांसाठी देशवासीय कृतज्ञ आहेत, म्हणून २०१४ पासून देशात ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त झाल्यानंतर जवळपास सर्वच स्वराज्य संस्थानांना भारत संघात सामील होण्यासाठी राजी करण्याचा अतुलनीय पराक्रम त्यांनी साधला.” असे मान. प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन केले.
कार्यक्रम सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केला होता. यावेळी सर्वांकडून प्रा. अजिंक्य पिंपळकर यांनी शपथ वाचन करून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश हलामी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. रमेश धोटे यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.