श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
चंद्रपुरातिल विशेष टीम ने शोध केला मात्र प्रेत व्याहाड बुज नहरात सापडला
पो.स्टेशन पाथरी अंतर्गत जनकपुर येथील घटना
तालुक्यातील जनकापुर येथील आजिच्या मयतिला गेलेला चेतन रविन्द्र कुमरे १८ वर्ष मुख्य नहरत वाहून गेल्याने त्याचा २४ तासानंतरही पत्ता लागत नसल्याने नातवाच्या शोध मोहिमे साठी विशेष शोध पथक चंद्रपुर येथून तैनात झाले, तपास केल्या गेला असता , तो चारगाव येथील रहिवाशी होता राधाबाई शामराव धुर्वे ६५ वर्ष रा जनकापुर ही आजी शनिवार रोजी मयत झाली त्यामुळे रविन्द्र कुमरे रा चारगाव याचे सर्व कुटुंब जानकापुर येथे मयतिला गेले होते रविवारी ११ वाजताच्या दरम्यान आजिच्या मयतिचा कार्यक्रम आटोपल्या नतर सारी मंडळी घड़ी गेली परिणामी मामा कडील काही नीलकंठ प्रकाश गेडाम १८ वर्ष जनकापुर कुणाल जितेंद्र धुर्वे १७ वर्ष, शैलेश नरेंद्र धुर्वे १८ वर्ष , चेतन अरुण धुर्वे १७ वर्ष , प्रज्वल गजानन मडावी १७ वर्ष रा . जनकापुर सोबत वाहून गेलेला तरुण चेतन रविन्द्र कुमरे १८ वर्ष रा .चारगाव अशी तरुण मंडळी मुख्य नहरत आजिच्या नावे आंघोळ करण्यासाठी गेली असता प्रज्वल नहरात उड़ी घेऊन वाहत जात असताना उर्वरित तरुनानी प्रज्वल याला बाहेर काढले त्याच दरम्यान चेतन याने नहरात उडी घेतली आणि वाहत जाण्यास सुरुवात झाली पहिलेच प्रज्वल ला वाचविन्या साठी इतर तरुनाची दमच्छाक झाली असता चेतन ला वाचविन्यासाठी प्रयत्न करता आला नसल्याचे घटना स्थळावरील तरुणांकडून सांगितले जात आहे परिणामी चेतन मुख्य नहरात वाहून गेला २४ तास लोटून गेले असताना वाहून गेलेल्या नातू चेतन चा थांग पत्ता लागला नाही
शोध मोहिमेत चंद्रपुर येथील विशेष शोध पथक सोबतच गावातील मंडळी नातलग लागले असून पोलिस प्रशासन कामाला लागले असून शोध कार्य सुरु झाले आणि 24 घंट्या नंतर व्याहाड बुज परिसरातील गोसे खुर्द नहरात सकाळी 11च्या सुमारास आज मृत देह सापडला हा प्रेत जवळपास चाळीस किमी अंतरावर भेटला. आजिच्या मयतिला गेलेला नातू आघोळीच्या निमित्याने मुख्य नहरात वाहत जाऊन स्वताचा जीव गमवूण बसला असल्याचे दिसुन येत आहे कुमरे परिवारातील चेतन हा लहान मुलगा असून कुमरे परिवारात दुःखाचे डोंगर कोसळले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केलि जात आहे



