श्री. विलास ढोरे,तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज:- कोंढाळा जवळ बैलबंडी आणि ट्रकच्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.
आरमोरी आणि देसाईगंज मार्गावरील कोंढाळा गावाजवळ ट्रकने बैलबंडीला धडक दिली असता श्रीकृष्ण माणिक वाढई हे गंभीर जखमी तर एक व्यक्ती मरण पावले आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमलेली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा लागलेला आहे. जखमींना तात्काळ येथील देसाईगंज रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. नागरिकांचा राग अनावर झाल्याने सदर अपघात करणाऱ्या ट्रकला नागरिकांनी पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे.



