श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
तलाठ्यांच्या उपस्थितीत झाली बैठक.
तालुक्यात अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले असून काही गावे जलमय झाली होती. तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष बांधावर येऊन पूरग्रस्त शेतीची पाहणी केली होती.सर्व्हे करून १३ हजार प्रतिहेक्टर नुकसान भरपाई देण्याची घोषणा करीत अंमलबजावणी करण्यात आली असता मात्र काही प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सर्व्हे करण्यात हलगर्जीपणा केल्याने शासनाची मदत मिळण्यात घोळ निर्माण झालेला आहे. तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या हितासाठी दखल घेऊन एसडीओ ,तहसीलदार, कृषी अधिकारी व तलाठी उपस्थितीत बैठक घेतली.
चिमूर तालुक्यातील शेती लागवड व नुकसान ग्रस्त चा अहवाल घेत तालुक्यातील व खरोखरच महालगाव ,सातारा अश्या घोळ निर्माण झालेल्या १० ते १२ गावातील वाढत्या तक्रारी वरून त्या गावातील फेर सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्यात यांवी व कमी निधी घेल्यास पुन्हा शासनाकडून वाढीव नुकसान ग्रस्त निधी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली.
एसडीओ कार्यालयात झालेल्या बैठकीत भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर ,ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, माजी सभापती प्रकाश वाकडे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार, तालुका महामंत्री प्रशांत चिडे, हेमराज दांडेकर, माजी जीप सदस्य सौ ममता डुकरे, सरपंच गजानन गुळधे, राजु बोडणे तर एसडीओ संकपाल, तहसीलदार बुरांडे मॅडम, कृषी अधिकारी तिखे आदी उपस्थित होते. तसेच तालुक्यातील तलाठी वर्ग उपस्थित होते.