सुरजागड येथील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक चीआपसात टक्कर

श्री.अनिल गुरनुले, अहेरी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

अहेरी:-बोरी नजीकच्या दीना नदी च्या पुलावर आज सांयकाळी 5:30च्या सुमारास सुरजागड येथील लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक चीआपसात टक्कर होऊन अपघात झाला आहे.
या अपघातातील एक ट्रक दीना नदीच्या पुलावरून पात्रात लोंबकळलेल्या स्थितीत आहे .ट्रक नदीत न पडल्याने जीवितहानी टळली,या अपघातामुळे चंद्रपूर आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती .
या मधील एक ट्रक त्रिवेणी कम्पनीचा तर दुसरा ट्रक चड्ढा ट्रान्सपोर्ट च्या मालकीचा असल्याची माहिती आहे.