मंत्री अ. सत्तार यांचा निषेध करीत राष्ट्रवादी युवक कॉग्रेसची कोरपना पोलीसात तक्रार दाखल

  श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

कोरपणा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल शिवराळ भाषेत प्रसार माध्यमांसमोर वक्तव्य करून असवैधानिक भाषेचा वापर करीत महिलांचा जाहीर अपमान करणाऱ्या व प्रसारमाध्यमासमोर बेताल वक्तव्य करून हो मी बोललो अशी ठामपणे वक्तव्य केलेल्या शेतकऱ्यांच्या समस्याचे जाण नसलेले व महिला बद्दल सन्मान नसलेले वक्तव्य करून आपल्या बुद्धीचा परिचय जनतेला दिला आहे अशा वेताळ मंत्र्यांचा निषेध करून मंत्र्याविरुद्ध घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरपणा पोलीस स्टेशन येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल करून पोलीस कारवाई करावी व मुख्यमंत्र्यांनी यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा , अशा वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला घरचा रस्ता दाखवावा अशी मागणी  तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल आबिद अली यांच्यासह विनोद मेश्राम, प्रीतम गेडाम, गणेश कोलते, विनोद जुमडे ,नाझीर कादरी ,शंकर टेकाम, संतोष ताजने , मनोज तोडासे यांनी केली आहे.