शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता मंजूर करा

चामोर्शी:- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखेच्या वतीने सतत पाठपुरावा केल्याने आक्टोंबर २०२२ चे वेतन दिवाळी पूर्वी द्यावी याची दखल घेत दिवाळी पूर्वी वेतन देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला मात्र केंद्र सरकार प्रमाणे जुलै २०२२ पासून वाढलेला वाढीव महागाई भत्ता अद्यापही शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आला नाही त्यासाठी जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व शिक्षक आमदार ना. गो. गाणार यांना निवेदन देऊन वाढीव महागाई भत्ता लागू करून त्वरित लाभ मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे

आमदार नागो गाणार,यांच्या प्रयत्नातून, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर २०२२ या महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याकरिता निवेदन दिले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन दिवाळी सणाचे महत्त्व लक्षात घेऊन दिवाळीपूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी मंजूर केले. मात्र केंद्र शासनाप्रमाणे जुलै २०२२ पासून वाढलेला वाढीव महागाई भत्ता अद्यापही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेला नाही. करिता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , शालेय शिक्षण मंत्री व शिक्षक आमदार गाणार यांना निवेदन देऊन
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जुलै २०२२ पासून वाढीव महागाई भत्ता लागू करून कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.