चिमूर तालुका आरोग्य मुक्त करू :– आमदार बंटीभाऊ भांगडिया.

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

सर्वरोग वैधकीय व दंत शिबीर

कोरोना काळात आपल्या देशातील मृत्यूदर जगापेक्षा कमी होते. याचे श्रेय आरोग्य विभागास असल्याचे आमदार बंटीभाऊ भांगडिया म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोर गरीब, शेतमजूर, शेतकरी बांधवांसाठी दुर्धर आजार उपचारासाठी ५ लक्ष रु ची योजना असून त्या रुग्णांची सुधारणा करण्यासाठी आहे.एखाद्या रुग्ण योजनेत बसत नसल्यास भांगडिया फौंडेशन कडून उपचार करून देण्याची ग्वाही दिली. येणाऱ्या काळात भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्याची सुद्धा सूचना केली. तालुका आरोग्य मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत सर्वरोग वैधकीय व दंत शिबिर चिमूर उपजिल्हा रुग्णालयात आमदार बंटीभाऊ भांगडिया बोलत होते.

यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजूकर ,ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ माया ताई ननावरे, सहकार नेते घनश्यामजी डुकरे, माजी जीप सदस्य सौ ममता डुकरे ,तालुका महामंत्री प्रशांत चिडे प्रवीण गणोरकर ,भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे, अमित जुमडे, भूषण सातपुते तसेच उपविभागीय अधिकारी संकपाल ,तालुका वैधकीय अधिकारी पटले, डॉ नंदनवार ,वैधकीय अधीक्षक डॉ अश्विन अगडे, डॉ किलनाके, डॉ बेंडले डॉ कनाके,पीएसआय सोनवणे आदी उपस्थित होते.

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते रुग्ण लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आले.

विविध आजार ,संसर्गजन्य, किटकजन्य,पौष्टिक आहार प्रदर्शनी चे उद्घाटन करण्यात आले.

शिबिरात उपचार करण्यासाठी आलेल्या रुग्णांची तपासणी केल्यावर दुर्धर आजार उपचारासाठी चंद्रपूर किंवा नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. सामान्य नागरिक यांनी आभा कार्ड काढणे आवश्यक असल्याने कोठेही मोफत उपचार होणार आहे. तसेच गोल्डन कार्ड बीपीएल साठी असून ५ लक्ष रु ची योजना आहे.

प्रास्तविक डॉ अश्विन अगडे यांनी केले. संचालन व आभार प्रकाश मेश्राम यांनी व्यक्त केले. तालुक्यातील शेकडो रुग्ण उपस्थित होते.