श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
पुढील अडीच वर्ष रत्नाकर चटप हे उपसरपंच पदाचे दावेदार
विरोधकांची दावेदारी सुद्धा नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नांदा ग्रामपंचायतच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना व गोंडवाना गणतंत्र पार्टी या चार पक्षांनी मिळून ग्राम विकास आघाडी च्या वतीने सतरा उमेदवार रिंगणात उतरविले होते व सरपंच पदाची उमेदवारी ही थेट जनतेतीतून लढविल्या गेली यामध्ये सहा प्रभागातून मेघा नरेश पेंदोर ह्या मताधिक्याने विजय होत सरपंच पदाच्या दावेदार ठरल्या तर उर्वरित 17 सदस्यांपैकी 15 सदस्य ग्रामविकास आघाडीचे विजयी झाले काँग्रेस प्रणित व भारतीय जनता पक्षाचा एक गट यांना केवळ दोनच विजय उमेदवारावर समाधान मानावे लागले निवडणूक आयोग व शासकीय निर्देशानुसार उपसरपंच हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जात असल्यामुळे शिवाय विरोधकांनी उपसरपंच पदाची दावेदारी सुद्धा न केल्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधून मताधिक्याने निवडून आलेले व मागील पंचवार्षिक योजनेत उपसरपंच पद भूषवलेले पुरुषोत्तम आत्माराम आस्वले यांची उपसरपंच म्हणून एकमताने निवड करण्यात आली शिवाय ग्रामविकास आघाडीच्या मुख्य नेत्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सुरू वातीचे अडीच वर्ष पुरुषोत्तम आस्वले व उर्वरित अडीच वर्ष दुसऱ्यांदा निवडून आलेले रत्नाकर भास्कर चटप उपसरपंच म्हणून पदभार सांभाळणार आहे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी व परिसरातील वातावरण बघता झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्तापालट होण्याचे चिन्ह समोर दिसत असताना सुद्धा विकास कामांना महत्व देत पक्ष भूमिका बाजूला सारत जनतेने ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूला भूतो न भविष्यातील निर्विवाद कल दिल्यामुळे विजय प्राप्त केलेल्या ग्रामविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारापुढे गावातील सार्वजनिक शौचालय सांडपाण्याची व्यवस्था रस्ते वीज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पथदिवे बीबी ते नांदा फाटा दुध डेअरी हा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणारा रस्ता असे अनेक विकास विषयक कामे पुढे असल्यामुळे समोर येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात या सर्व जनतेच्या समस्या व अपेक्षा ग्रामविकास आघाडी पूर्ण करतील अशी अपेक्षा नांदा ग्रामस्थांनी केली असून नवनियुक्त महिला सरपंच मेघा नरेश पेंदोर उपसरपंच पुरुषोत्तम आसवले नवनिर्वाचित सदस्य रत्नाकर चटप संजय मडावी सुषमा दुर्वे मंगेश दुर्वे कैलाश डाकरे जयश्री ताकसांडे सुनिता महादेव आत्राम अश्विनी पुरुषोत्तम मळावी संजय कोवे मंगला बंडू गायकवाड प्रकाश बोरकर मेघराज मडावी सुजाता चौधरी यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते संजय मुसळे निलेश ताजने सुमेध ठाकूर आकाश बोनगींवार प्रा़ अनिल मुसळे हरिभाऊ बोरकुटे सुरेश धोटे जगजीवन शंभरकर शंकर काकडे अखिल शेख लहुजी गोंडे मनोहर झाडे यादव नांदेकर वासुदेव शंभरकर अनिल पेंदोर प्रवीण कुरसंगे रवी बंडीवार बंडूची लिंगे रवींद्र चिंचोलकर राहुल पाचवभाई योगेश मुळे बाबाराव मोहितकर विनोद इटनकर भास्कर लोबडे पुरुषोत्तम पुट्टावार संजय पोहाने किसन गोंडे रवींद्र चिंचोलकर हेमंत वाटेकर दिलीप निंदेकर आशिष मेंढे मुरलीधर बोडके सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व नांदा ग्रामवासी यांनी अभिनंदन केले असून गावाच्या विकासाचा झंजावात मागील पाच वर्षाच्या च्या विकासाच्या वेगाच्या तुलनेपेक्षाही दुपटीने वाढवावा अशा अपेक्षाही गावकरी बांधवांनी व्यक्त केल्या आहे शिवाय नुकत्याच पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रिये दरम्यान निवडणूक निरीक्षक म्हणून तहसील विभागाचे श्री एन के डवस आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते