पळसगाव खुर्द साझातुन अवैध गौण खनिजाची तस्करी, महसूल व गोसेखुर्द विभागाचे दुर्लक्ष

 श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

तळोधी बा : नागभीड तालुक्यातील जनकापूर व पळसगाव खुर्द या गावांना लागून असलेल्या टेकडीच्या मध्य भागातून उजव्या कालव्याचे काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून कालव्याचे चे काम जलद गतीने सुरू आहे. या ठिकाणी ब्लास्टिने टेकडी फोडली जात आहे.या ठिकाणी मोठया प्रमाणावर गिट्टीचे ढिगारे तयार झाले आहे. मात्र या ठिकाणाहून गिट्टी व मुरूमाची विनापरवाना वाहतूक केली जात आहे. दिवसाढवळ्या गौण खनिज खुलेआम पणे तळोधी बालापुरला वाहतूक होत असताना कारवाई केली जात नाही त्यामुळे शासनाला लाखो रुपयाचे महसूल बुडत आहे. त्यामुळे शासनाची नुकसान होत आहे. महसूल विभाग व गोसेखुर्द उजव्या कालव्याचे मुख्य अधिकारी यांच्याशी तस्करी धारकांचे मधुर संबंध असल्याने कारवाई होत नाही असे बोलले जात आहे.

त्या ठिकाणी संबंधित विभागाकडून अवैध वाहतूक करु नये अशा सूचनांचे फलक लावले आहे मात्र अजुनपर्यंत एकाही तस्करावर कारवाई केली नाही. पळसगाव खुर्द येथे रेतीचीही तस्करी सुरू आहे. गावाशेजारी रेतीची साठवण केली आहे. मात्र महसुल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तरी संबंधित तस्करावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.