धान कापणी करीत असतानाच वाघाच्या दर्शनाने दहशत

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

सावली तालुक्यातील विरखल येथील शेतकरी शेतात धान कापणी,बांधण सुरू आहे.अशातच विरखल शिवारात धान कापणीचा हंगाम सुरू असताना अचानक चक विरखल रोड जवळील दुपारी ४.००वाजताच्या सुमारास वाघ दिसला त्यामुळे महिला आरडाओरडा केल्या वाघ पळाला .त्यामुळे शेतात काम कस करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला सदर घटनेची माहिती वनरक्षक खुडे यांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.वाघाच्या दर्शनाने शेतकऱ्यांत प्रचंड दहशत पसरली आहे.