श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
देसाईगंज: स्थानिक आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी ए अंतिम वर्षाची कु. प्रांजली ढोरे हिची राष्ट्रीय साहसी शिबीर मनाली करिता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीची प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.
दि. 15 नोव्हे. ते 24 नोव्हे. 2022 दरम्यान अटल बिहारी वाजपेयी स्पोर्ट मनाली येथे राष्ट्रीय साहसी शिबीर 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात देशातील विविध राज्यातील विविध विद्यापीठातून राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका सहभागी होत आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून या शिबीराकरिता एक स्वंयसेवक व एक स्वयंसेविका पाठवायचे होते. यात आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील कु प्रांजली ढोरे हिची निवड करण्यात आली व ती राष्ट्रीय साहसी शिबीर मनाली करिता रवाना झालेली आहे.
या शिबीराकरिता निवड झाल्याबद्दल गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. श्याम खंडारे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे गडचिरोली जिल्ह्य समन्वयक डॉ. श्रीराम गहाणे, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश हलामी यांनी कु. प्रांजली ढोरे हिचे अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्यात.