श्री. यदु चापडे, धानोरा प्रतिनिधी
स्थानिक धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केल्याची घटना 10 नोव्हेंबरला उघडकीस आली यामुळे शहरात एकच खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार शाळेला दिवाळीच्या पंधरा दिवसाच्या सुट्टी असल्याने तसेच सिक्युरिटी गार्ड नसल्याने या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला यामध्ये एक लाख 88 हजार पाचशे रुपये असा ऐवज चोरून लंपास केला यामध्ये एक एलईडी टीव्ही एक मॉनिटर एक बॅटरी वायरलेस दोन माईक वेल्डिंग मशीन हँड ड्रिल मशीन बॅक कॅमेरा वॉटर पंप इन्वर्टर सेट असा एकूण एक लाख 88 हजार पाचशे रुपयांचे शैक्षणिक साहित्य लंपास केले ही घटना 10 नोव्हेंबरला सकाळी शाळा उघडल्यावर दरवाजे खुले असल्याचे दिसून आले त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला.
सदर घटनेची माहिती मुख्याध्यापक कोहाडे यांनी धानोरा येथील पोलीस स्टेशनला देण्यात तक्रार देण्यात आली तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्राप्त माहितीनुसार तीन संशयिताची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते या घटनेचा तपास धानोरा येथील पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मिथुन शिरसाट हे करत आहे