बिरसा मुंडा चौकात महामानवांच्या प्रतिमांचे अनावरण

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज 

आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा चौकात आज बिरसा मुंडा जयंतिच्या निमित्य महामानवांच्या प्रतिमांचे अनावरणक्षेञाचे आमदार क्रिष्णाभाऊ गजबे यांच्या हस्ते पार पडले देसाईगंज येथिल माता वार्ड व आंबेडकर वार्ड चौरस्त्याला भगवान बिरसा मुंडा चौकाचे नामकरण करण्यात आले. माजि नगराध्यक्ष श्याम उईके यांनी समाज बांधवांच्या भावना लक्षात घेवुन आज बिरसा मुंडा जयंतिच्या औचित्यने स्थानिक माता वार्ड व आंबेडकर वार्ड चौरस्त्यातिल बिरसामुंडा चौकात भगवान बिरसामुंडा राणि दुर्गावती विर बाबुराव सडमाके यांच्या प्रतिमारुपी फलकाचे अनावरण कार्यक्रम आयोजित केला

या कार्यक्रमाचे उद्घाटक आरमोरी विधानसभा क्षेञाचे आमदार क्रिष्णा गजबे भाजपा उपजिल्हाध्यक्ष मोतिलाल कुकरेजा तालुकाध्यक्ष राजुभाऊ जेठानी माजी नगराध्यक्ष श्याम ऊईके उद्योगपती गुन्नीचंद अग्रवाल सचिन वानखेडे माजि पंस उपाध्यक्ष नितिन राऊत क्रिष्णा कोहचाडे मिना कोडापे मंदा उईके सरिता उईके नेहा उईके सरोज उईके टिकाराम सिडाम साजन मेश्राम पुंडलिक उईके हिवराज इईके बळवंत सिडाम राजु सिडाम यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .