आदर्श शाळा चिंचाळा येथे शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

भद्रावती

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चिंचाळा येथे शिष्यवृत्ती परिक्षा तसेच नवोदय विद्यालय पात्र विद्यार्थ्यांचा तसेच परिक्षेत मार्गदर्शक शिक्षक प्रविण ईश्वर डोर्लीकर यांचा सत्कार करण्यात आला.

सन २०२० ला एकुण १२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत, सन २०२१ ला शिष्यवृत्ती तसेच नवोदय विद्यालय परिक्षेत प्रत्येकी २ विद्यार्थी, तर २०२२ मध्ये शाळेतील ३ विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय तळोधी करीता निवड झाली. तसेच नुकतेच घोषित झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात १४ विद्यार्थी पात्र ठरले. या यशामागे मुख्याध्यापक नामदेव आस्वले तथा सर्व शिक्षक वृन्द, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश शंकर शेंडे आणि सर्व समिती पदाधिकारी यांचे नियोजन यशस्वी ठरले. शिष्यवृत्ती व नवोदय चे वर्षभर स्वतंत्र वर्ग व मार्गदर्शक शिक्षक प्रविण डोर्लीकर यांचे नियोजनबद्ध पद्धतीने अध्यापन व विद्यार्थ्यांचा पेपर सोडविण्याचा झालेला भरपूर सराव त्यामुळेच हे यश संपादन करता आले असे मुख्याध्यापक नामदेव आस्वले यांनी सांगितले.

पात्र विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समिती तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश शेंडे, उपाध्यक्ष ज्योती जुनघरे, डॉ. दशरथ झाडे, मायाताई धोटे, दिपाली आंबिलकर, सरस्वती नरेटी, मंजुषा नेरलवार तसेच मुथा फाउंडेशन चे चंद्रपूर जिल्हा समन्वयक अविनाश पोईनकर, रवी गुरनुले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊराव घुगुल, तुकाराम गेडाम, पंकज उद्धरवार, मेघा शर्मा, राहुल वैद्य यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नामदेव आस्वले, संचालन योगिता येरणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदिप टिपले यांनी केले.