श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या माकोणा गावातील मुख्य मार्गाची मागणी भिम आर्मि संविधान रक्षकदल महाराष्ट्र राज्य चिमुर च्या वतिने ग्रामपंचायत सावरी व जिल्हापरिषद चंद्रपुर येथे करण्यात आली होती अशी माहिती भिम आर्मी संविधान रक्षकदल चे अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी दिली आहे .तसेच बातमी प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली असल्याचेही सांगितले.
त्याच बातमीची दखल आज घेण्यात आली व भिम आर्मीच्या मागणीला यश आले असून गावकऱ्यांच्या वतिने सुध्दा संघटनेला खुप प्रतिसाद देण्यात आला आणि त्यामुळेच या मागणीला यश प्राप्त झालेत माकोणा गावातील परीसर आता एका शहरापेक्षा कमी नाही असे म्हणायला हरकत नाही कारण भिम आर्मि च्या वतिने या रसत्याची मागणी केली होती ती मागणी आज पूर्ण करण्यात आली आणि रस्त्याच्या बाजुला सुशोभित असे गट्टु सुध्दा लावण्यात आले त्यामुळं गावातील नागरिक भिम आर्मि संविधान रक्षकदल महाराष्ट्र राज्य चिमुर चे अध्यक्ष जगदीश मेश्राम याचे खुप आभार व्यक्त करत आहेत.