श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
नागभीड तालुक्यात येत असलेल्या चिंधीचक येथिल गावा जवळच्या विहीरीत एका महीचे दुपारी साडे बारा वाजता शुक्रवारला शव आढळल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.मंगला विकास दोडके (३४) रा.तिव्हला गन्ना असे मृतक महीलेचे नाव आहे.मृतक मंगला हिला डोक्याचा आजार असल्याने ती पागल सारखी वागत होती.त्यामुळे तिची बहीण शकुंतला रामुजी दोडके रा चिंधीचक हीने फेरबदला साठी आपल्या गावाला आणले.पण ती घरुन निघुन गेली.तीचा गावात सर्वत्र शोध घेण्यात आला.पणा ती कुठेच सापडली नाही.शेवटी गावाच्या बाहेर एका विहीरीत तिचे मृत अवस्थेत शव आढळुन आले.मृतक मंगला ही पागल असल्याने आजाराला कंटाळून विहीरीत उडी घेतली अशी तक्रार नागभीड पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.