श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२३/११/२०२२ आक्सापूर
गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा येथील शेतकरी साईनाथ इंद्रदास ठेंगणे (वय ४०) याने काल (दि.२२) विष घेऊन स्वतःच्या घरीच आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज (दि.२३) उघडकीस आली आहे.
सततची नापिकी आणि यावर्षी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती यामुळे पूर्णता पीक नष्ट झाले.अचानक होत्याचे नव्हते झाले.हातावर आणून पानावर खाण्याइतपत ठेंगणे कुटुंबीयांची दयनीय अवस्था.अशावेळी पूर्वी शेतीवर घेतलेल्या पीक कर्जाचा डोंगर साईनाथपुढे उभा होता.कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेमुळे शेवटी मुलगा शाळेत गेला असता पत्नी मजुरीला गेल्याची संधी त्याने साधली.दरम्यान घरी एकटाच राहिलेल्या या युवा शेतकऱ्यांनी शेतात वापरावयाचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.साईनाथच्या पश्चात पत्नी,मुलगा,आई असा परिवार आहे.कुटुंबातील कर्ता पुरुष सोडून गेल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.