श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२५/११/२०२२
सिंदेवाही
बहुजन विचार प्रबोधन मंच व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका सिंदेवाहीच्या वतीने भारतीय संविधान दिन पर्वानिमित्य तालुकास्तरीय संविधान सन्मान परिषद कार्यक्रम रविवार दि .27 नोव्हेंबर रोजी सकाळी 12.00 वाजता बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक ,सिंदेवाही येथे आयोजित करण्यात आला आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान अभ्यासक इंजि ..संजय मगर ब्रम्हपुरी राहणार असून प्रमुख अतिथी समाजसेविका डा .पूनमताई घोडमोडे व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा .कैलास ढेंगळे ,चंद्रपूर उपस्थित राहणार आहेत .
याप्रसंगी सकाळी 12 वाजता समता सैनिक दलाच्या उपस्थित संविधान रॅलीचे आयोजन , दुपारी 2 वाजता संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन व अतिथी मार्गदर्शन कार्यक्रम ,संध्याकाळी 4 वाजता बहुजन समाज पार्टीतर्फे आयोजित महापुरुष्यांच्या जीवनावरील तालुकास्तरीय प्रश्न -मंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण समारंभ ,संध्याकाळी 5 वाजता सामूहिक भोजनदान कार्यक्रम व संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध भीमशाहीर संभाजी ढगे व संच चंद्रपूर यांचा समाजप्रबोधनपर बुद्ध -भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आदी विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमाचा तालुक्यातील प्रबुद्ध जनतेनी लाभ घ्यावा ,असे आवाहन आयोजक दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सिंदेवाहीचे अध्यक्ष विकास गेडाम ,बहुजन विचार प्रबोधन मंच सिंदेवाहीचे अध्यक्ष चंद्रप्रकाश चहांदे यांच्यासहित विविध पक्ष ,महिला मंडळ ,विध्यार्थी संघ व सामाजिक संघटनानी केले आहे .