विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना हीच शिक्षकांची तारणहार -अजय लोंढे यांचे प्रतिपादन

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२५/११/२०२२

चामोर्शी

खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या अजूनही अनेक समस्या व प्रश्न शासन दरबारी धुळखात आहेत परंतु त्या सर्वांची दखल घेणारी लढवय्यी संघटना आहे . म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना हीच शिक्षकांची तारणहार म्हणून सर्वत्र ओळखली जाते. असे प्रतिपादन सीनेट सदस्य तथा सहकार्यवाह अजय लोंढे यांनी प्रतिपादन केले .

देवडी (चामोर्शी ) येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डाॅ . राजेंद्र झाडे , प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार , प्राचार्य विधान बेपारी ,प्राचार्य ईतेंद्र चांदेकर व तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भावी उमेदवार म्हणून उभे असलेले विमाशीचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांना प्रचंड बहुमताने विजयी करून सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले अमूल्य मत सुधाकर अडबाले यांना देण्याचे आवाहन डॉ . राजेंद्र झाडे , प्राचार्य अनिल गांगरेड्डीवार , विधान बेपारी ईतेंद्र चांदेकर, यांनी उपस्थित शिक्षकांना केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुनघाडकर तर आभार गजानन बारसागडे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी विमाशीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले .