गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२५/११/२०२२ चामोर्शी
चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील ग्रामसेवक सिद्धार्थ मेश्राम हे ग्रामपंचायत कमिटीला विश्वासात न घेता स्वतः मनमानी कारभार करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करून नवीन ग्रामसेवक वाघोली ग्रामपंचायतीला देण्यात यावे.अशी मागणी वाघोलीच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.
ग्रामपंचायत वाघोली येथील सचिव मेश्राम हे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यासोबत अरेरावी भाषा करून आपल्या पद्धतीने मनमानी कारभार करीत असल्याने गावातील अनेक कामे प्रलंबित असून त्यांच्या अशा वागणुकीमुळे वाघोली येथील ग्रामपंचायत कमिटीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवक देण्यात यावे अशी सुद्धा मागणी केलेली आहे. यावेळी सरपंच सोनी प्रमोद किरमे, उपसरपंच राहुल गजानन पोरटे, ग्रा.पं. सदस्य राहुल पांडुरंग उराडे, तुळशीराम सातपुते, दिवाकर भोयर, नंदाबाई पोरटे, द्वारका गायकवाड, दिपाली मानकर,जयाताई किरमे आदी उपस्थित होते.
याबाबतीत वाघोली येथील ग्रामसेवक सिध्दार्थ मेश्राम यांना विचारणा केली असता
मि स्वत:च्या मर्जीने कोणतेही काम करीत नसून ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांना विश्वासात घेऊनच प्रत्येक निर्णय घेत असतो. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे व निरर्थक असून राजकीय द्वेषापोटी करण्यात आलेले आहेत