श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२५/११/२०२२
देसाईगंज
राज्याचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांना जुन्या काळातील व माफिविर म्हणून अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुधांशु ञिवेदी यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारुन व काळे फासुन देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतिने जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते परसराम टिकले,तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,शहर अध्यक्ष आरीफ खानानी,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे,माजी नगरसेवक हरिष मोटवाणी, तालुका महासचिव पंकज चहांदे, महिला शहर अध्यक्ष यामिना कोसरे, कोषाध्यक्ष पुष्पा कोहपरे, रजनी आञाम,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विलास ढोरे,संजय बन्सोड,भीमराव नगराळे,नरेश लिंगायत,अनिल कुंमरे,राजेश बहादुरे,लखन मंडपे,विजय पिलेवान,सुनिल सहारे,टिकाराम सहारे आदी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान शहराच्या फव्वारा चौकात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुधांशु ञिवेदी यांनी छञपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याच्या विरोधात जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी करुन रयतेचे राजे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना तडकाफडकी महाराष्ट्रातुन हाकलण्याची तसेच भाजपाचे प्रवक्ते सुधांशु ञिवेदी यांची तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.