आम्ही आमच्या आरोग्यासाठीचा जागतिक स्त्री हिंसा विरोधी पंधरवडा कार्यक्रमाला सुरुवात

श्री.श्याम यादव  तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२६/११/२०२२  

कोरची

आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेतर्फे 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत स्त्री हिंसाविरोधी पंधरवाडा निमित्याने एकजूट व्हा, महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार संपवा अभियान अंतर्गत विविध जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सध्या संपूर्ण देशाने भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आजादी का अमृत महोत्सव साजरे केले आहेत. परंतु अजूनही महिला संविधानिक अधिकारानुसार वागणूक मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांचे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक व लैंगिक शोषण केले जात आहे. स्त्रियांना पाहिजे तसे स्वातंत्र्य अजूनही मिळाले नाही. मागील पंधरा वर्षांपासून दरवर्षी जनजागृतीसाठी 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत विविध उपक्रम राबविले जातात. महिलांच्या संरक्षणात्मक शासन पातळीवर अनेक कायदे आले पण त्याची अंमलबजावणी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये होत नसल्याने हिंसेचा फैलाव झालेला असल्याचे दिसून येत आहे.

मानव विकास मिशन अंतर्गत शालेय मुली मुलांसाठी असणारी शासकीय बस सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा सुरू करण्यात यावी, वन हक्क कायदा 2006 नियम 2008 अनुसार सुधारित नियम 2012 नुसार जल जंगल जमिनीवरील मालकी हक्क ग्रामसभांकडे असल्यामुळे जंगलाच्या व्यवस्थापन व संवर्धनाचे कार्य ग्रामसभा स्वतः करीत आहेत. तरी सुद्धा झेंडेपार, सोहले, भर्रीटोला, आगरी, मसेली, बोडेना या ग्रामसभांच्या सभोवतालच्या जंगलात जे लोहखनिज उत्खननसाठी ग्रामसभांच्या मंजुरी नसतानाही शासकीय स्तरावरून ऐतिहासिक अन्याय होताना दिसत आहे. हे खनिज उत्खनन सुरू झाले तर नागरिकांच्या उपजीविकेचे साधने नष्ट होतील, पिण्याचे शुद्ध पाणी, हवा यावर विपरित परिणाम होतील, शेती नष्ट होईल, महिला मुलींवर अत्याचार होण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही, गावांना आपल्या जंगलावरील हक्क राहणार नाही, वन हक्क कायदा 2006 अंतर्गत सामूहिक आणि वैयक्तिक वन हक्क दावे देण्यासंदर्भात शासकीय यंत्रणे कडून अंमलबजावणी संदर्भातील येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, गरोदर महिलांसाठी सोनोग्राफीची नियमित सोय करण्यात यावी, कोरची तालुक्यातील आशा कार्यकर्ता यांची पदे रिक्त असल्यामुळे गावातील महिला, मुले, गरोदर माता, किशोरवयीन मुली आणि गावकरी यांचे आरोग्यावर परिणाम होत आहेत यामुळे ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावी तसेच दिव्यांग संबंधी असलेल्या प्रत्येक मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी  अशी मागणी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेतर्फे करण्यात आली.
कुमारी जमकातन, संगीता तुमडे, शुभदा देशमुख, नितीन पंडित, सतीश कुसराम, चेतन चौधरी व महेश लाडे उपस्थित होते