मनुवादी प्रवृत्तीला संविधानाने उत्तर देणे काळाची गरज – गुरूचरण ऊईके

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
आदिवासी एकता युवा समिती तर्फे संविधान दिन साजरा
स्थानीय गडचिरोली येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी एकता युवा समिती द्वारा 73 वा संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थाना वरून सेवा निवृत्त नायब तहसिलदार गुरूचरण ऊईके यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, आज देशाला संविधान समर्पित होऊन 73 वर्षे पूर्ण होत आहे. परंतु इथल्या प्रस्तापित मनुवाद्यांनी आतापर्यंत संविधानामध्ये नमुद केलेल्या अनुसुचिनुसार कार्य न केल्यामुळे आज 85% बहुजन समाजाला आपल्या न्यायिक हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकरच्या सहभाग, शिक्षण, समता या त्रिसुत्रि मधून 85% बहुजन समाजाने फक्त शिक्षण घेऊन नौकरीवर लागण्याचे काम केले. परंतु समाज जागृतीच्या कार्यात कमी पडल्यामुळे इथल्या मनुवाद्यांनी आमच्या याच कमतरतेचा फायदा घेऊन 85% बहुजन समाजात धर्माचे जाळे पसरविले आहे आमचा बहुजन समाज त्यात फसल्यामुळे आज या देशाच संविधानच धोक्यात आले आहे. त्यामुळे या प्रस्तापित मनुवांद्यांन पासुन संविधानाचे रक्षण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सर्व प्रथम संविधान निर्माते डाँ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान सभेमध्ये आदिवासीचे नेतृत्व करणारे जयपालसिंह मुंडा व संविधान पुस्तकेला पुष्पमाला अर्पण करून व संविधान प्रास्तविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
यावेळी संघटनेचे मार्गदर्शक मुकुंदाजी मेश्राम सर यांनी सुध्दा उपस्थित जनसमुदयास मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन गिरीश ऊईके तर संविधान प्रास्ताविकेचे वाचन मंगेश नैताम व आभार प्रदर्शन माणिक गेडाम मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आदिवासी एकता युवा समितीचे संजय मसराम, उमेश ऊईके, प्रफुल्ल कोडाप, आकाश कोडाप, देवाजी कोडाप, राहुल गेडाम सहीत परिसरातील नागरिक उपस्थित होते.