श्री.भुवन भोंदे प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२६/११/२०२२
देसाईगंज
देसाईगंज तालुक्यातील माता वार्ड येथे बिरसामुंडा चौक या ठिकाणी संविधान दिवसानिमित्त बाईक ऱ्यालीचे जंगी स्वागत करण्यात आले. या ठिकाणी युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी तर्फे सर्व प्रतिष्ठित नागरिकांचे पुष्प गुच्छ देऊन चाय व बिस्कीट वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी तालुका अध्यक्ष राजुभाऊ जेठानी, मा. नगरअध्यक्ष शाम उईके, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन वानखेडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन खरकाटे, मा. विलासजी लोखंडे, कृष्णाजी कोहचाडे, विजयजी पिल्लेवान व ईतर नागरिक उपस्थित होते.