श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२६/११/२०२२
शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करुन ठार केल्याची घटना नागभीड वनपरीक्षेत्रातील पाहर्नी बिटात आज शनिवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. वनिता वासुदेव कुंभारे वय 55 वर्षं असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
ब्रह्मपुरी उपविभागात मागील अनेक दिवसापासून वाघाचे हल्ले वाढले होते दरम्यान काही दिवसापूर्वी एका वाघाला वनविभागाने जेरबंद केले असताना आज शनिवारी सायंकाळी 5 वाजता दबा धरून बसलेल्या वाघाने पाहर्णी येथील वनिता वासुदेव कुंभारे वय 55 वर्षं ही जनावरासाठी शेतात गवत कापायला गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला करुन ठार केले. Nagbhid renge tiger attack
घटनास्थळावर वनविभागाचे पथक दाखल झाले असून पंचनामा करीत आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.