श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२६/११/२०२२ चिचपल्ली
आज 26 नोव्हेंबर 2022 रोज शनिवार ला चंद्रपूर जिल्यातील चिंचपल्ली येथील श्रावस्ती बौध्द विहार च्या पटांगणात सामाजिक अध्यक्ष आयु. प्रफुल भाऊराव दुर्योधन यांच्या मार्गदर्शनात संविधान दिनानिमित्ताने संविधनाबाबत संपूर्ण गावातून महत्त्व उद्घोषणा देत सविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संविधान दिनानिमित्त प्रश्न मंजुषा घेण्यात आली. लहान मुलांनी भारतीय संविधान बाबत चे व्यावहारिक जीवनातले महत्व भाषणातून विषद केले. गावातील महिला व ,पुरुष मंडळ उपस्थित राहुन संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. यावेळी लहान मुलांना बुक व पेन भेट देण्यात आले