राजुरा बसस्थानकाचे छत कोसळले, विद्यार्थी जखमी 

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२८/११/२०२२

राजुरा

बल्लारपूर रेल्वेस्थानका पाठोपाठ छत कोसळण्याची दुसरी घटना

राजुरा येथील वन विभागाच्या वसाहत मधील झाडे बसस्थानकावर पडल्याने छत कोसळले आहे.या घटनेत मनोज पाझरे वय ( २५ वर्ष ) हा विद्यार्थी जखमी झाला आहे.दोन दिवस अगोदर बल्लारपूर रेल्वेचे फुटब्रिज कोसळल्याची घटना ताजी असतांना बसस्थानकचे छत पडल्याची ही दुसरी घटना समोर आली आहे.

Roof Collaped of Rajura Bus Stand , One student injured

बसस्थानकच्या मागे वन विभागाची वसाहत आहे.या वसाहत सभोवताल मोठमोठे झाडे आहे.यातील काही झाडे बसस्थानकला लागून आहे.यातील एक झाड तोडण्यात येत होते असे समजते.अचानक झाड बसस्थानकावर पडले.त्यामुळे छताचे सिमेंट पत्रे खाली कोसळले. या घटनेत मनोज पाझरे नामक विद्यार्थी जखमी झाला आहे.अन्य काही मुलांना सुध्दा किरकोळ मार लागल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण एसटी महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती तब्बल दोन तासानंतर देखील वरिष्ठांना दिली नसल्याचे समजते.

वन विभागाने झाड तोडत असल्याची कोणतीही पूर्वसूचना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली नसल्याची चर्चा आहे.

ग्रामीण भागातही वाघांच्या हल्ल्यामुळे वनविभागाचा हलगर्जी पण दिसून येत असतांना सुद्धा आता शहरी भागातही वनविभागाचे किस्से ऐकायला मिळत आहे