आदिवासी एकता युवा समिती द्वारे कै. बाबूराव मडावी यांना अभिवादन’

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२८/११/२०२२

गडचिरोली 

स्थानिय आदिवासी एकता युवा समिती द्वारे क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक चामोर्शी रोड गडचिरोली येथे गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार तथा आदिवासींत श्रध्दास्थान असलेले कैलासवासी बाबुराव मडावी यांची 95 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सतिश कन्नाके सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमरसिंह गेडाम छत्रपती मडावी, देवराव अलाम, गुरुचरण उईके, पुंडलिक नैताम, सुखदेव वेटे, आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सचिव प्रदिप कुलसंगे यांनी केले तर आभार मुकुंदाजी मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता संघटनेचे संजय मसराम, सुधीर मसराम, मंगेश नैताम, गिरीश उईके, उमेश उईके, सिडाम सर , मडावी सर, सुनंदाजी वेटे, रुषि होळी, नामदेव उसेंडी यांच्या सह समाज बांधवांनी सहकार्य केले.