देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथील शिवाजी विद्यालयातील खो-खो मुले संघ तालुकास्तरावर अव्वल

श्री.भुवन भोंदे,प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.२८/११/२०२२

देसाईगंज  

देसाईगंज येथे नुकताच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत तुळशी येथील शिवाजी विद्यालयाच्या संघाने १७ वर्षे वयोगटातील मुलांनी खो-खो स्पर्धेत अजिंक्य राहून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवित जिल्हास्तरावर आपला प्रवेश निश्चित केला आहे शालेय सत्र २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या देसाईगंज तालुका क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल देसाईगंज येथे आयोजित करण्यात आला होता अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला असून तुळशी शिवाजी विद्यालयातील मुलांनी प्रतिस्पर्धीवर मात करून तालुक्यात अव्वल आल्याचा बहुमान मिळवला आहे.संघ प्रशिक्षक शिक्षक एन. जी. शेंडे यांच्या मार्गदर्शनात खेळाडू विद्यार्थी आदर्श राजेश मारबते पुरूषोत्तम नरेश मारबते अनिकेत मोहन कोल्हे शुभम विलास मारबते मोहित निलकंठ गोठे चैतन्य भाष्कर तोंडफोडे नंदकिशोर तानाजी राउत यज्ञेश्वर देवचंद दोनाडकर गौरव विष्णू सुकारे सौरभ प्रकाश मेश्राम रोहन विलास ठाकरे निखिल विकास मारबते या विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून खो-खो स्पर्धेचे यश खेचून आणले या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष प्रा. विजय कावळे मुख्याध्यापक विष्णू दुनेदार आणि सर्व कर्मचारीवृंदानी संघ प्रशिक्षक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे यानंतर जिल्हास्तरावर सुद्धा यशस्वी व्हावे यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.