न्यूज जागर प्रतिनिधी साकोली
दि.३०/११/२०२२
साकोली
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीचा आज सकाळी मृतदेहच आढळला. साकोली तालुक्यातील पापडा खुर्द येथील या हृदयकारक घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. श्रद्धा किशोर सिडाम (८) असे मृत चिमुकलीचे नाव असून ती तिसऱ्या वर्गात शिकत होती.
प्राप्त माहिती नुसार श्रध्दा ही सोमवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास शाळेतून आल्यावर घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली होती. मात्र रात्रो उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तीचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता तीचा कुठेच पत्ता लागला नाही. त्या नंतर परिवारातील सदस्यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री १०.३० वाजता आपल्या ताफ्यासह पापडा खुर्द गाठले. मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही तिचा थांगपत्ता लागला नव्हता.
A charred body of ku. Shraddha Kishor Sidam (8) paprda khurd, was found in a pile of weeds.
आज, बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता तो श्रद्धाचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.