इलेक्ट्रिक करंट देऊन रानडुकराची शिकार करणाऱ्या सहा आरोपींना अटक

न्यूज जागर प्रतिनिधी चामोर्शी

दि.३०/१/२०२२

चामोर्शी  

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या आबापूर येथे विद्युत प्रवाहाने रानडुकराची शिकार करणाऱ्या सहा आरोपींना वनविभागाच्या पथकाने अटक केली आहे.
मधुकर सुधाकर लेकामी रा. आबापूर, भगवान वासुदेव नैताम, मोरेश्वर सखाराम ठाकूर दोघेही रा. भाडभिडी, मधुकर भाऊजी पोटावी रा. कराडगुडा, बाजीराव राजू पोटावी रा. देवदा, मधुकर गणू कोवासे रा. पुसेर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

#Wild boar hunting by live electric current at kunghada forest range office 

आबापूर जंगल परिसरात २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास जिवंत विद्युत प्रवाह लावून रानडुकराची शिकार करण्यात आली असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने आबापूर गाव गाठून मधुकर लेकामी यांच्या घराची चौकशी केली असता, घराच्या मागच्या बाजूला रानडुकराचे मांस वाळू घातले असल्याचे दिसून आले. अधिक माहिती घेतली असता सदर मांस भाडभिडी येथील भगवान नैताम यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मोरेश्वर ठाकूर यांच्या मदतीने बाबाजी नैताम यांच्या शेतात विद्युत प्रवाह सोडण्यात आला. यात दोन जंगली डुकरे मृत्युमुखी पावल्याचे सांगितले. एका डुकराचे मांस मधुकर लेकामी यांना तर उर्वरित एका डुकराचे मांस मधुकर कोवासे, मधुकर पोटावी, बाजीराव पोटावी यांना विकल्याचे सांगितले. या अंतर्गत सहाही आरोपीविरोधात वन्यप्राण्यांची शिकार करून मासांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी राहुल तांबरे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक सुरेश गव्हारे, एस. एम. मडावी, वनरक्षक प्रकाश कोराम, एन. बी. गोटा यांनी केली