नवखळा येथे एड्स बाबत जनजागृती रॅली

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.१/१२/२०२२

नागभीड 

एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र ग्रामीण रुग्णालय नागभीड व संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था अंतर्गत लिंक वर्कर प्रकल्प व मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा याचे संयुक्त विद्यमान दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाडला जातो जगभर पसरलेल्या एड्स या जिवघेण्या रोगाबद्दल सर्व सामन्य लोकामध्ये जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्या मानवा विषयी शोक व्यक्त करण्यासाठी हा 1 डिसेंबर जागतिक एड्स दीनाचे निमित्त साधून जनजागृती रॅली काढण्यात आली ही रॅली प्रामुख्याने मीनाताई मा.वी.या ठिकाणाहून मुख्यध्याप श्री पी बी गेडाम याचे उपस्थित रॅलीला हिरवी झेंडी दाखवून उपकेंद्र,मेन रोड मार्गे रॅली काढण्यात आली या वेळी रॅली दरम्यान HIV एड्स या आजारा विषयी घोष वाक्याचा वापर करून व माहिती पत्रक वाटप करत या जनजागृती रॅलीची सांगता करण्यात आली.

या वेळी उपस्थित श्री पी बी गेडाम सर मुख्यध्याप,सीमा मेश्राम समुपदेशक ICTC नागभीड,डी सी खोब्रागडे LWS,शीतल आयलनवार LT ICTC नागभीड, प्रतिभा भोगेकर RH नागभीड, श्री एस एस शेख,के डी भिवंगडे,कु एस डी ठाकरे मॅडम,श्री एस टी चौधरी सर,श्री जी पी देशकर,श्री एस एल निकुरे,श्री व्ही बी घ्यार,श्री आर जे जांभूळे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते