श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.१/१२/२०२२
ब्रम्हपुरी
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परीषद कार्यालय चंद्रपुर यांचे अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन नुकतेच जिल्हा स्टेडियम चंद्रपुर येथे पार पडले.
सदर स्पर्धेत ब्रम्हपुरी येथिल ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर काँलेज ब्रम्हपुरी येथिल विद्यार्थ्यांनी भाग घेवुन जिल्हातुन यश संपादन केलेले आहे.त्यात जलतरण स्पर्धेत १४ वर्ष मुले वयोगटातुन दिप हेमंत उरकुडे याने ५० मिटर फ्रि,ब्रेस्ट,बटर या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला.तसेच१७ वर्ष मुलिंच्या वयोगटात विधी हेमंत उरकुडे हिने फ्रि,ब्रेस्ट, बटर या तिन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.१७ वर्ष मुलांच्या वयोगटात यश घनश्याम चाैधरी याने फ्रि प्रकारात द्वितिय, ब्रेस्ट प्रकारात प्रथम तर बटर प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला.तसेच१९ वर्ष मुलिंच्या वयोगटात अपुर्वा दिपक उईके हिने फ्रि,ब्रेस्ट,बटर या तिनही प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला .
त्या सोबतच बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षाखालिल वयोगटात यश प्रशांत धकाते याने तिसरा तर १७ वर्ष वयोगटातिल किक बाक्सिंग स्पर्धेत आदित्य कावळे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला .सर्व यशस्वी स्पर्धकांचि विभागिय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
खेळाडुंना विद्यालयातिल क्रिडाशिक्षक मिलिंद पाठक व गोविंद करंबे यांचे मार्गदर्शन लाभले.खेळाडुंच्या यशाबद्दल विद्यालयाचे व्यवस्थापक फादर कुरीयन,मुख्याध्यापक सिस्टर पावना,उपमुख्याध्यापिका सिस्टर जिन्सिटा तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनि काैतुक केलेले आहे.