गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.१/१२/२०२२
सिरोंचा
१ डिसेंबर २०२२ रोजी, जागतिक एड्स दिनानिमित्त एकात्मिक समुपदेशन, व तपासणी केंद्र ग्रामिण रूग्णालय सिरोंचा द्वारा, रॅलीचे आयोजन करण्यात आले, या रॅली मध्ये भगवंतराव कला महाविद्यालय,डॉक्टर .सी. व्ही. रमन विज्ञान महाविद्यालयातील युवक युवती सहभागी होते.
या रॅली ला, मुख्यमार्गदर्शन ग्रामीण रुग्णालय सिरोंचा चे, वैद्यकिय अधिक्षक डॉक्टर वलके, HIV/AIDS वर माहीती देत असताना त्यांनी सांगितले कि एच आय व्ही म्हणजे,हुयमन इमूनवडिफेशियशी व्हायरस, एड्स आकवायर्ड, इमिनोडीफिशयांशी सिंड्रोम, एच आय व्ही हे विषाणू आहे, तर त्यापासून एड्स हा आजार होतो .
एच आय व्ही बाधित स्त्री, पुरुषांसोबत असुरक्षित शारीरिक संबंध,आणि,एच आय व्ही बाधित रक्त घेतल्यास,एच आय व्ही बाधित व्यक्तीची सुई सिरिन्ज वापर केल्यास, व एच आय व्ही बाधित गरोदर स्त्री पासून तिच्या होणाऱ्या बाळास ,यामुळे हा रोग पसरतो ,
एकसारखा ताप,वजनात 10 टक्के घट,तोंडात घशात फोड येणे,भूक कमी होणे,अतिसार एक।महिन्यापेक्षा जास्त, गुप्तरोग,क्षयरोग,
असे लक्षणे असले तरी, जोपर्यंत रक्त तपासत नाही, तो पर्यंत कोणालाही एच आय व्ही एड्स बाधित म्हणू शकत नाही,असेही त्यांनी सांगितले , एच आय व्ही एड्स ची लक्षणे दिसत असल्यास, जवळच्या शासकीय रुग्णालयातील एकात्मिक समुपदेशन,आणि चाचणी विभागातील ICTC यांचे कडे जाऊन,समंती पत्र देऊन एच आय व्ही चाचणी करावी, ही चाचणी पूर्णतः गोपनीय असून, l मोफत असते, ICTC समुपदेशक हे त्याचे समुपदेशन करतात, आणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ रुग्णाच्या तीन तपासण्या करतात,त्या रुग्णाला एच आय व्ही बाधित असल्याचा अहवाल त्यांना देतात.
तर आपण महाविद्यालयीन युवक युवतीने, आपल्या परीसरात व जवळील लोकांना वरील लक्षणे आढळल्यास,जवळील रूग्णालयात पाठवावे असे मोलाचे मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सुत्र संचालन, एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्राचे समुपदेशक, प्रकाश लाडे,ह्यानी करताना, युवक,युवतीनी,विवाह करण्याआधी दोघांनी एचआयव्ही तपासणी करूनच,लग्न करावा असा संदेश त्यांनी दिला.
या रॅली मध्ये,भगवंतराव कला महाविद्यालयातील प्राचार्य,डॉक्टर कलोडे सर,प्राध्यापक वर्ग डॉक्टर तुला, डॉक्टर भोयर,डॉक्टर ठावरी,डॉक्टर उरकुडे, डॉक्टर महेशकर, जक्कु,व शिक्षकत्तेर कर्मचारी वर्ग,
डॉक्टर .सी. व्ही. रमन विज्ञान महाविद्यालयातील ,प्राचार्य डॉक्टर फिरदौसी, NSS/RRCविभाग प्रमुख,प्राध्यापक पाटील,डॉक्टर शेंडे, डॉक्टर कांताराव, शेख आणि ग्रामिण रूग्णालय सिरोंचा येथील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दुर्वा, डॉक्टर सुरपाम,डॉक्टर शाजीया, RKSK समुपदेशक कोविद कुमरे, NELP कुष्टरोगतंत्रज्ञ कोंडागुर्ले,व ईतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते,